Monday, April 7, 2008

आवाहन : आपण ह्याबाबत काही करू शकतो का?

आजच्या म.टा. मधली ही बातमी वाचून खूप अस्वस्थ झाले.

ह्या हरणांसाठी आपण वन्यखात्यावर दबाव आणण्याव्यतिरिक्त काही मदत करू शकलो का?

वनखात्याची उदासीनता हरणांच्या मुळावर8 Apr 2008, 0234 hrs IST

- म. टा. वृत्तसेवा, जळगाव सातपुड्याच्या कुशीतल्या निसर्गरम्य पाल येथील हरिण पैदास केंदाला वनखात्याकडून निधी उपलब्ध होत नसल्यामुळे केंदातील २२ हरणांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच हरणांना खाण्यासाठी वनखाते चारादेखील उपलब्ध करून देऊ शकत नसल्याने अन्नाअभावी मुक्या प्राण्यांचे हाल होत आहेत. महिन्याला केवळ पाच हजार रुपयांची गरज असताना वनखाते ती पूर्ण करू शकत नाही. उलट हे केंद बंद करण्याचा आदेश वनक्षेत्रपालांना नाशिक वन्यजीव विभागाकडून मिळालाय. शासनाने तातडीने लक्ष घालण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. पाल येथे १९७२-७३ मध्ये हरणांचे पैदास केंद सुरू झाल्यावर काळवीट, चौशिंगा, सांबर, चितळ अशा दुमिर्ळ जातीची हरणे तेथे आणण्यात आली. १९९९ मध्ये येथल्या प्राण्यांची संख्या ८० वर गेली. केंदाला 'सेंट्रल झू अॅथॉरिटी'ने एक वर्षासाठी मान्यता देताना काही अटी घालून त्यांची पूर्तता करण्याच्या सूचना वन विभागाला दिल्या. त्या अटींत पालच्या हरिण पैदास केंदाचा दहा वर्षांचा मास्टर प्लन तयार करणे, सहा वर्षांचा व्यवस्थापनविषयक आराखडा करणे, वन्यजीवांच्या रहिवासाच्या जागेत सुधारणा, औषधोपचाराच्या सोयी, पैदास केंदाला भिंंत घालणे, पूर्ण वेळ व्हेटरनरी डॉक्टरची नियुक्ती करणे, देखरेखीसाठी कर्मचाऱ्याची नियुक्ती करणे, केंदात जन्म, मृत्यू, नवीन समाविष्ट प्राण्यांची माहिती ठेवण्यात यावी, अशा अटी होत्या. मात्र त्याची पूर्तता होऊ न शकल्याने केंदाला पुढे मान्यता मिळाली नाही. अटींच्या पूर्ततेसाठी पैसा लागणार होता व तो वन विभागाकडून मिळालाच नाही. परिणामत: सध्या पालच्या केंदात २२ हरणे असली तरी पैशांअभावी त्यांच्या जीवन मरणाचा सवाल उभा राहिलाय. ३१ मार्च २००७ मध्येच हे केंद बंद करण्याचे आदेश दिले गेले होते, मात्र जनरेट्यामुळे आजही हे केंद सुरू असले तरी कोणत्याही क्षणी ते बंद करावे लागेल, अशी स्थिती आहे. त्यानंतर हरणांना बाहेर सोडून दिले जाईल. १९९९ मध्ये हे केंद बंद झाले होतेच. त्यावेळी तेथील ८० हरणांना बाहेर सोडून देण्याची पाळी आली. केंदाबाहेर येताच कुत्र्यांनी काही हरणांचा फडशा पाडला तर हाकलून दिलेली हरणे परत केंदाच्या दारात येऊन उभी रहात होती. नागरिकांच्या जोरदार विरोधामुळे वनविभागाला माघार घ्यावी लागली होती. आता सात वर्षांनी परत या केंदातील हरणांची उपासमार होऊ लागली असून, ही हरणे सोडून देण्याची तयारी सुरू आहे. हरणांच्या खाण्यावर दरमहा पाच ते सात हजारांचा खर्च होतो. वनखात्याची हाही खर्च करण्याची ऐपत नाही. केंदातील कर्मचारी हरणांसाठी जंगलातून चारा आणू बघतात, तर वनखात्याचे अधिकारी तोडू देत नाहीत. शासनाची उदासीनता, वनखात्याच्या दिखाऊ व पोकळ धोरणामुळे हे केंद बंद होण्याच्या मार्गावर असल्यानेच आता नागरिकांनीच पुढे येऊन हे केंद वाचविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी वन्यजीवरक्षक अभय उजागरे यांनी पुढाकार घेतला आहे. ......

Sunday, February 4, 2007

वाळवंटातील इंद्रधनू




शुक्रवारी दुपारी फाहीलला भटकून घरी परतत होतो…छान पाऊस पडून गेला होता. गाडीच्या काचेतून सहजच समोर लक्ष गेलं…तर चक्क निसर्ग राजाने नभोमंडपी बांधलेले तोरण दिसले…डोळ्यांवर विश्वासच बसेना..
या कुवेती वाळवंटी हा चमत्कार पहायला मिळेल असं कधी वाटलं नव्हतं..

Wednesday, November 22, 2006

kshanastha

क्षणस्थ हा शब्द पहिल्यांदा वाचला डॉ अभय बंग यांच्या माझा साक्षात्कारी ह्रदयरोग या पुस्तकात...वाचला त्या क्षणाला फार आवडला. live the moment you are living...! जेवताना फक्त जेवा...ऑफिसचा विचार करून जेवणाची मजा घालवू नका. अभ्यास करताना फक्त अभ्यास...

मी देखील ठरवलं आहे...मनात आलेल्या गोष्टी प्रामाणिकपणे आणि नियमितपणे इथे लिहायच्या.

Tuesday, November 21, 2006

shree ganesha

aaj navin madhyamatun lihayacha shreeganesha kela